उन्मादाच्या विरोधात एक कविता
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घृण हत्येनंतर सोशल मीडियावर जो उन्माद कालपासून उधाणला आहे, त्या उन्मादाच्या विरोधात ही कविता आहे. उन्माद हा नदीच्या पुरासारखा असतो. तो फार काळ टिकत नाही. टिकूच शकत नाही. एका निर्भिड पत्रकाराच्या हत्येचं निर्लज्ज समर्थन करणाऱ्यांच्या उन्मादाचंही तसंच होईल. नक्की होईल. तो आशावाद बुलंद करणारी ही कविता आहे... उन्मादाच्या विरोधातली.......